शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०

वृषभ लग्न द्वादश लग्नानुसार धनहानी आणि कर्जबाजारी योग


१. वॄषभ लग्नामध्ये दशमस्थानाचा स्वामी शनि जर षष्ठात, अष्टमात किंवा द्वादश भावात असेल तर जन्मस्थानात अर्थिक प्राप्ती नसते व त्याला जीवनामध्ये सदैव धनाची कमतरता असते. अशा व्यक्तीला जीवनात कर्जाचा सहारा घेण भाग पडते.

२. वृषभ लग्नामध्ये लग्नेश शुक्र जर षष्ठात, अष्टमात आणि द्वादश स्थान्त असेल आणि सूर्य (रवी) तुळेचा असेल तर ती व्यक्ती कर्जबाजारी होते.

३. वृषभ लग्नामध्ये द्वितीय स्थानात जर पाप ग्रह असेल किंवा लाभेष गुरु षष्ठात, अष्टमात, द्वादशात असेल तर अशा व्यक्तीला सहजपणे कर्ज मिळू शकत नाही. व ती व्यक्ती कायम दरिद्री रहाते.

४. वृषभ लग्नामध्ये केंद्रस्थानाला सोडून चंद्र, गुरु जर षष्ठमस्थान, अष्टम स्थान, द्वादशस्थानात बसला असेल तर तो संकष्ट योग मानला जातो. त्या कारणाणे जातकाला सदैव धनाची कमतरता भासते. चंद्र गुरुचा गज केसरीयोग सुध्दा बनतो. पण ६,८,व१२ स्थानात हा योग नष्ट होऊन संकष्ट योग निर्माण होतो.

५. वृषभ लग्नामध्ये अष्टमेश गुरु शत्रूस्थानात किंवा नीच राशीचा असेल किंवा बुध द्वादशस्थानात असेल तर अचानक धनहानीने जातक कर्जबाजारी बनतो.

६. वृषभ लग्नामध्ये लाभेश गुरु, षष्ठम, अष्टम व द्वादश स्थानात असेल किंवा लाभेश अस्त, पापपीडीत झाला असेल तर जातक अति गरीब असतो.

७. वृषभ लग्नामध्ये धनेश बुध अष्टमात किंवा द्वादशात व अष्टमेश गुरु वक्रि झाला असेल तर त्या जातकाच्या घनाचा नाश होतो.

८. वृषभ लग्नामध्ये धनेश बुध अस्त होऊन नीच राशीमध्ये असेल व धनस्थानात किंवा अष्टमस्थानामध्ये कुठलाही पापग्रह असेल तर तो जातक सदैव ऋण ग्रस्त असतो.

संजीव